बापरे क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्यने तरुण युवकाचा मृत्यू.

क्रिकेट खेळ एका तरुणाच्या जीवावर बेतला

बापरे क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्यने तरुण युवकाचा मृत्यू.

बापरे क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्यने तरुण युवकाचा मृत्यू

पंढरपूर येथील क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळत असताना तरुण युवक विक्रमच्या गुप्तांगाला चेंडूचा जोरात फटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

विक्रम गणेश शिरसागर वय 35 राहणार नेपतगाव असे मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. सदरची घटना ही आज शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी घडली असून संपूर्ण क्रिकेट प्रेमी व नेपतगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तावशी येथील मान नदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दुर्दैवी घटनेमुळे क्रिकेट विश्वात

शोककळा पसरली आहे.

समजलेल्या माहितीनुसार विक्रम गणेश शिरसागर तावशी येथील मान नदीच्या पात्रात आज आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता. सामना खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका बसला. त्यावेळी विक्रम मैदानावर खाली कोसळला व त्याच्या मित्राने त्याला तत्काळ लागलीच ताबडतोब पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु उपचार दरम्यान विक्रम चा मृत्यू झाला आहे.

विक्रम हा कुटुंबातील मोठा मुलगा असून आई वडील बहिण भाऊ पत्नी व एक मुलगा मुलगी आहे. अचानक धक्कादायक दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण नेपतगावा मध्ये हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोक कळा पसरली आहे .