स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रम

हर घर झेंडा उपक्रमराबवण्याबाबत पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय च्या वतीने भव्य जनजागरण रॅली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रमराबवण्याबाबत पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय च्या वतीने भव्य जनजागरण रॅली

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्यसंग्रमातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये *हर घर झेंडा* हा उपक्रम राबविण्या साठी पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य जनजागरन रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर, मुख्याध्यापक अभय आराध्ये पर्यवेक्षक रवींद्र लांबतुरे, समूह संघटक संतोष कसबे, योगेश काळे, कृष्णात जगताप, क्रीडा शिक्षक रविंद्र पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात लोकमान्य विद्यालय येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक जय भवानी चौक वरून पुन्हा लोकमान्य विद्यालय येथे याचा समारोप करण्यात आला यावेळी बोलतानामुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले .

केंद्र शासन व राज्य शासनाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या गौरवशाली पर्वा निमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केले आहे त्यानुसार राज्यात 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढायच्या स्मृति कायम तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी लोकांच्या मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव हा देशभरात *हर घर झेंडा* हा उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनावर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणेसाठी या रॅलीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले तसेच शहरातील नागरिकांसाठी शहरांमध्ये नगरपरिषद इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक, दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक चौक, चार ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने स्टॉल उभा करण्यात येणार असून या स्टॉलवरून नागरिकांनी झेंडा खरेदी करावी असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी यांनी केले 

 यावेळी अभिजित घाडगे,बचत गटाच्या श्रीमती वैशाली माने, सुजाता राऊत, वंदना बिडकर सर्व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या