माजी नगरसेवक महादेव भालेराव यांचे निधन

पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्वपक्षीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित

माजी नगरसेवक महादेव भालेराव यांचे निधन

माजी नगरसेवक महादेव भालेराव यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक महादेव भालेराव यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी बुधवार दि .५ जुलै रोजी सकाळी ७वाजता निधन झाले आहे. ते माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव यांचे पती होते. पंढरपूर येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. यावेळी पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्वपक्षीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी बाळासाहेब कसबे, आप्पा जाधव, सुनील सर्वगोड, संजय सावंत, जितेंद्र बनसोडे, युवा नेते प्रणव परिचारक, तसेच पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, माजी नगरसेवक किरण घाडगे, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक राजू सर्वगोड, नगरसेवक धोत्रे, आठवले ,माघाडे इत्यादी मान्यवरांनी भालेराव यांच्या कुटुंबातील दुःखामध्ये सहभागी असल्याचे सांगितले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.