ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने पुळुजवाडी ग्रामपंचायत विकास निधीत केला भ्रष्टाचार .

ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने पुळुजवाडी ग्रामपंचायत विकास निधीत केला भ्रष्टाचार .

ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने पुळुजवाडी ग्रामपंचायत विकास निधीत केला भ्रष्टाचार .

ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने पुळुजवाडी ग्रामपंचायत विकास निधीत केला भ्रष्टाचार 

पंढरपूर दिनांक 12 ऑक्टोबर पंढरपूर तालुक्यातील पूळुजवाडी येथील ग्रामसेवक व सरपंचांनी संगणमताने ग्रामपंचायतला येणाऱ्या विकास निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे पुळुजवाडी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आलेने श्री नितीन संदिपान मदने व ग्रामस्थांनी लेखी तक्रार पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

गट विकास अधिकारी श्री प्रशांत काळे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी श्री एन एस काळे यांना ताबडतोब चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश देण्यात आला आहे. सदर प्रकरणी विस्तार अधिकारी एन एस काळे यांनी प्रत्यक्षात पूळुजवाडी ग्रामपंचायतीत दी.29 सप्टेंबर2022 रोजी सखोल चौकशी करण्यासाठी तक्रारदार ग्रामस्थ व सध्याचे कार्यरत असलेले ग्रामसेवक यांना पुळुजवाडी ग्रामपंचायत मध्ये या विकास कामाच्या निधी संदर्भात चौकशी करण्यााची तक्रार दाखल केली .त्यावेळी संबंधित विस्ताराधिकारी श्री काळे यांनी सदर आपण दिलेल्या तक्रारीची पूर्ण चौकशी पडताळणी करून सदरचा अहवाल पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येईल असे सांगितले. दी.२९ ऑगस्ट 2022 रोजी पुळुजवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा घेण्यात आली होती त्यावेळी नितीन संदिपान मदने व ग्रामस्थांनी पुळुज वाडी गावांमध्ये स्मशानभूमी सुशोभीकरण समाज मंदिर सुशोभीकरण आरोप्लेन्ट. अंगणवाडी सुशोभीकरण शाळा सुशोभी करण तसेच जन सुविधा योजनेअंतर्गत विविध कामे कर्मचारी पगार विविध कामाची निनावी बिले काढणे काम न करता कामाची बिले काढणे अगोदर झालेली कामे दाखवून कामाची बिले काढणे एकाच कामासाठी दोन मुले काढणे अशा विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा अंदाज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. हा अंदाज लक्षात घेता ग्रामस्थांनी झालेल्या विविध विकास कामासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

गट विकास अधिकारी यांनी सदर पुळुजवाडी श्री मदने व ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग विस्तार अधिकारी श्री काळे यांना दिले असल्याने विस्तार अधिकारी श्री काळे हे नेमका गट विकास अधिकारी समोर  काय निर्णय देणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. सदर चौकशी व अहवाल याबाबतीत आम्हाला शशांक निर्माण झाल्यास पुढील कार्यवाही म्हणून जिल्हा परिषद मुख्य अधिकारी व जिल्हाधिकार्यालय सोलापूर व आयुक्त पुणे यांच्याकडे सदर प्रकाराची चौकशी लावणार असल्याची तक्रारदार श्री मदने व ग्रामस्थांनी सांगितले आहे.