मकर संक्रात उत्सव निमित्त महिला भाविकांचे दर्शन सुलभ होणार

अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू

मकर संक्रात उत्सव निमित्त महिला भाविकांचे दर्शन सुलभ होणार

मकर संक्रात उत्सव निमित्त महिला भाविकांचे दर्शन सुलभ होणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर

पंढरपूर दिनांक 13 जानेवारी श्री विठ्ठल रूक्मिणी मातीचे मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीच्या दिवशी (रविवार, दि. १४/०१/२०२४ रोजी) श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३.०० ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल तर त्यांनी पहाटे ४.३० ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी ०६.३० वा. पर्यंत दर्शन सुरू करण्यात येईल.

तसेच भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि.१४/०१/२०२४ रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत करणेत येईल. पदस्पर्श दर्शन पहाटे ०६.०० वा. नंतर सुरू करणेत येईल.दि.१५/०१/२०२४ रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झालेनंतर श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे.तसेच दि.१६/०१/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा वेळेत करण्यात येणार आहे. दि.१५/०१/२०२४ रोजी मकरसंक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.