पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी चोरट्यांच्या आवळल्या मुस्क्या आरोपीस अटक
पंढरपूर कार्तिक यात्रेतील जबरी चोरीतील अज्ञात आरोपी

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी चोरट्यांच्या आवळल्या मुस्क्या
गुन्ह्यातील रिक्षा व 58 हजार पाचशे रक्कम केली हस्तगत
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे व पोलीस कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी
पंढरपूर कार्तिक यात्रेतील जबरी चोरीतील अज्ञात आरोपीस अटक करून आरोपीकडून 58 हजार पाचशे एवढी मोठी रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वाखरी तालुका पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा दरम्यान जनावरांचा बाजार पाहण्यासाठी यातील फिर्यादी शंकर सिताराम भालसिंग राहणार वाळकी तालुका जिल्हा अहमदनगर हे त्याचे नातेवाईकासोबत अकलूज येथून 22 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10:30 वाजनेच्या सुमारास वाखरी येथे आले होते. त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी रिक्षा भाड्याने करून पंढरपूर येथे जात असताना यातील आरोपी रिक्षा चालक व त्याचे साथीदारांनी फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे जवळील रोख रक्कम 58 हजार पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. त्यामुळे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची गांभिर्य लक्षात घेता ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हूंबे यांनी आपली पोलीसी खाकी दाखवत शोधचक्र फिरवत असताना प्रथम अज्ञात आरोपीने ज्या रिक्षाचा वापर केला ती रिक्षा निष्पन्न करून रिक्षासह गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पुण्यातील रोख रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मारुती दिवसे सपोफौ आप्पा करचे राहुल शिंदे गणेश इंगोले सपने राजेंद्र गोसावी शरद कदम प्रसाद आवटी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री हुंबे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मारुती दीवसे करत आहेत.