विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती

शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न केली जाते

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नितीन काळे यांची एक मतांनी निवड

पंढरपूर दिनांक 4 मार्च नितीन काळे यांची महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या‌ जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे एकमताने निवड.. विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकी जपत विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न केली जाते.. अनेक सामाजिक उपक्रम राबवुन प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकांना न्याय मिळवून दिला जातो.. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि राज सर्वगोड यांनी ही संस्था स्थापन करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा ध्यास घेतला आहे...‌ प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक व समाजामध्ये चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात येत आहे.. अनाथ मुलांना देखील आधार देण्याचे काम ही संस्था करत आहे. म्हणुनच या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार देखील मिळाला आहे या संस्थेचे कार्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे.. यावर्षी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी समाजसेवक भाई नितीन काळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.. एक युवा नेतृत्वाला संधी दिल्याने प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे... नितीन काळे यांनी देखील विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत की मला खूप कमी वयात माझे काम आणि विचार पाहुन तुम्ही माझी एकमताने निवड केली त्याबद्दल नितीन काळे यांनीही आभार मानले.. अनेक पदाधिकारी यांच्या निवडी देखील संपन्न झाल्या आहेत.. प्रत्येकाला काम करण्याची संधी विश्व भुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली आहे.... भाई नितीन काळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक पत्रकार उपस्थित होते...