अन्यथा येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकू

दहा गावच्या ग्रामस्थांनी दिला इशारा

अन्यथा येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकू

अन्यथा येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकू

दहा गावच्या ग्रामस्थांचा इशारा

शनिवार दिनांक 13 जानेवारी मंगळवेढा -येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकापूर्वी मंगळवेढा -शिरनांदगी रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकू असा इशारा डोंगरगाव, हाजापूर, जालीहाळ, सिद्धकेरी, रड्डे, शिरनांदगी, खोमनाळ, पाटखळ, आंधळगाव व खडकी या दहा गावच्या गावाकऱ्यांनी दिला आहे.मंगळवेढा -शिरनांदगी, डोंगरगाव -पाटखळ, डोंगरगाव -आंधळगाव, डोंगरगाव -खोमनाळ हे रस्ते अत्यंत खराब व अर्धवट अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. या रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा म्हणून या दहा गावच्या ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक 12 .01 . 2024 रोजी मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले त्याप्रसंगी हा इशारा दिला आहे.यावेळी जि. प. बांधकाम विभागाचे अभियंता श्री. कोष्टी, श्री. मुलगीर, यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या 15 दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 या आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे, ऍड. रविकिरण कोळेकर (रड्डे )माधवानंद आकळे (हाजापूर )भीमराव मोरे (पाटखळ )डी. के. साखरे (डोंगरगाव )डोंगरगाच्या सरपंच सारिका खिलारे, माजी सरपंच मंगल मेटकरी, वैशाली चंदनशिवे, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय जाधव, क्रांती दत्तू यांचेसह शेकडो नागरिक सहभागी होते.