चेअरमन अभिजीत पाटीलसह 20संचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूरतालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल.

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ

चेअरमन अभिजीत पाटीलसह 20संचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूरतालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल.

राज्य शिखर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मोठी कारवाई

चेअरमन अभिजीत पाटीलसह 20संचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूरतालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य बँकेकडून 252 कोटी कर्ज व त्यावरील 177 कोटी रुपये व्याज आहे. सदर कर्जापोटी कारखान्याकडून प्रति क्विंटल साखर पोत्यातून800 रुपये भरले जातील अशी आश्वासन दिले होते.परंतु श्री विठ्ठल साखर कारखान्याने तसे केले नाही.श्रीविठ्ठल साखर कारखान्याने राज्य बँकेच्या कर्जापोटी फक्त 30 ते 80 कोटी रुपये भरणे आवश्यक असताना एवढी रक्कम न भरल्याने राज्य बँकेने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजीत पाटीलसह त्यांच्या 20 संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेचे श्री कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

श्री विठ्ठल साखर कारखान्याने राज्य बँकेकडून सन 2020 मध्ये कर्ज घेतले असले तरी 2022/ 23 पर्यंत जास्तीत जास्त म्हणजे 30 ते 80 कोटी कर्ज परतफेड होणे गरजेचे होते. चेअरमन अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढवून कारखाना आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी सर्व संचालक सभासदांना कारखाना चांगला चालवून नफ्यामध्ये आनू असे आश्वासन दिले होते .परंतु राज्य बँकेचे 252 कोटी कर्ज आणि 177 कोटी व्याज हे माहे 31 डिसेंबर 2023 अखेर असल्याने चेअरमन अभिजीत पाटील यांनी मुद्दल व व्याजापोटी रक्कम न भरल्यामुळे मोठे अडचणीत सापडले आहेत. अशा या प्रकरणामुळे राजकीय मंडळींमध्ये मात्र उलट सुलट चर्चा सुरू असून आज दिवसभर चर्चेला ठिकठिकाणी चौकात उधान आले आहे. यावर्षी विठ्ठल कारखान्याने इथेनॉल प्रकल्प सुरू केला असून या मिळणाऱ्या रकमेतून कमीत कमी 52 कोटी रुपये राज्य बँकेकडे भरणे अपेक्षित असताना त्यांनी तसे न करता फक्त 30 कोटी रुपये भरले असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे. चेअरमन अभिजीत पाटील यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रीय पक्षचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा .शरद पवार गटात प्रवेश केला आहे आणि खा. शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी अभिजित पाटील यांच्यावर सोपवली आहे. तसेच शरद पवारांची जवळचे समर्थक झाले आहेत त्यामुळे तर ही राजकीय खेळी नसावी का असा अंदाज चेअरमन अभिजीत पाटील यांनी केला आहे. परंतु सध्या तरी या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात चर्चा तुफान पसरली आहे.