प्रहार' च्या आंदोलनात घेतली अ. भा. रिपब्लिकन पक्षाने उडी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष घालण्याची मागणी

प्रहार' च्या आंदोलनात घेतली अ. भा. रिपब्लिकन पक्षाने उडी

'प्रहार' च्या आंदोलनात घेतली अ. भा. रिपब्लिकन पक्षाने उडी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष घालण्याची मागणी

मंगळवेढा-:नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 मध्ये मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा तसेच शासन व प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणाऱ्या मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समींदर यांच्या विरुध्द कारवाई करण्यात यावी या मागण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाउपाध्यक्ष सिद्राय्या माळी व तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 17 दिवसापासून मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू आहे. आंदोलनाचा सलग  17वा दिवस असताना देखील शासन प्रशासनाने ठोस कारवाई करण्याऐवजी आंदोलन कर्त्यांच्या कडे पाठ फिरवली आहे.
              सोमवार दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार च्या या आंदोलनास भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना साखरे म्हणाले की आंदोलन कर्त्यांच्या मागण्या योग्य व न्याय असून यामध्ये प्रांत अधिकारी आप्पासाहेब समींदर हे स्वतःच गुंतले असून सदर प्रकरणी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतः लक्ष घालून आंदोलन कर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या या भूमिकेचे हॉटेल राजधानी चे मालक जयंत ठेंगील यांनी स्वागत केले असून यावेळी अशोक रणदिवे, राहुल लोखंडे, शब्बीर सय्यद, वैशाली सावंत, वैशाली चंदनशिवे, अविंदा गायकवाड यांच्या सह अ. भा. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
        येत्या 2  दिवसात आंदोलन कर्त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त न केल्यास गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी निदर्शने करणार असल्याचे साखरे यांनी सांगितले.