श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 11 लक्ष रुपयाची देणगी.
राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सन्मान

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 11 लक्ष रुपयाची देणगी;
पंढरपूर (ता.8):- मुंबई येथील भाविक जयंत दत्तात्रय म्हैसेकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 11 लक्ष रुपयाची देणगी धनादेश स्वरूपात दिली.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने श्री म्हैसेकर यांचा सत्कार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मदन महाराज हरिदास व देणगीदार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या देणगीदाराने आतापर्यंत मंदिर समिती एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.