लोकसभा 42 सोलापूर मतदार संघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

दिव्यांग व 85 वर्षे वरील 533 मतदानापैकी 502 जणांनी मतदान केले

लोकसभा 42 सोलापूर मतदार संघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

लोकसभा 42 सोलापूर मतदार संघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज. प्रांताधिकारी सचिन इथापे.

पंढरपूर दि. 5 मे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यात 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सात मे 2024 रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांत अधिकारी श्री सचिन इथापे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पुरुष मतदार 1 लाख 84 हजार 624 तर स्त्री मतदार 1 लाख 73 हजार 191 व इतर मतदार 23 असे एकूण 3 लाख 57 हजार 838 एवढे मतदार व 549 सैनिक मतदार आहेत. मतदार संघाचा एपी रेटीओ दिनांक 19/ 4 /2024 रोजी 78.81 एवढ आहे. गेंडर retio हा 937 आहे. मतदार संघामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदार 6997 असून 20 ते29 वयोगटातील मतदार हे 75 हजार 699 इतकी आहेत. तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या ही 5354 असून सार्वजनिक बांधकाम विभाग मतदारसंघही 2587 इतकी आहे.

मतदारसंघांमध्ये एकूण मूळ मतदान केंद्र 337 त्यामध्ये शहरात 108 व ग्रामीणमध्ये 229 अशी असून 337 मतदान केंद्रे आहे तसेच 337 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे मतदारसंघांमध्ये 1केंद्र क्र.72 गौतम विद्यालय पंढरपूर. मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तसेच 50% प्रमाणे 173 मतदान केंद्रावर वेब कॉस्टिंग करण्यात येणार आहे. मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना मंडप व्यवस्था बैठकीवस्था शुद्ध पिण्याचे पाणी दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर मतदान केंद्रात रॅम्प ओ आर एस पाकिटे वैद्यकीय सुविधा हिरकणी कक्ष प्रथमोपचार पेटी मदत कक्ष स्वतंत्र प्रसाधन गृह पुरेशी प्रकाश व्यवस्था आदी बाबी उपलब्ध राहणार आहेत. मतदारांना आपले मतदानाचे केंद्र मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभ रित्या उपलब्ध होण्यासाठी बीएलओ मार्फत घरोघरी मतदार चिट्ट्या 80 टक्के वाटप केल्या आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मदतीसाठी सवयसेवक असणार आहेत. महिला कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र क्र 102 पंढरपूर दह कवठेकर प्रशाला पश्चिम बाजूची खोली क्र एक व मतदान केंद्र क्रमांक 183 मंगळवेढा न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा पश्चिम बाजूची खोली नंबर 14 नवीन इमारत येथे महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथील मतदान केंद्रात संपूर्ण व्यवस्थापन महिलांचे राहणारा आहे. मतदान केंद्र 257 गोणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोणेवाडी जवाहर योजना इमारत खोली नंबर एक येते दिव्यांक कर्मचाऱ्यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे तेथील मतदान केंद्रात संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचाऱ्यांचे राहणार आहे. मतदान केंद्र क्रमांक 160 तरटगाव कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्व बाजूची खोली क्र दोन तरडगाव कासेगाव व मतदान केंद्र क्रमांक 272 ला मान तांडा माध्यमिक आश्रम शाळा लमाण तांडा जिन्याच्या डाव्या बाजूने खोली नंबर एक येते युवा कर्मचाऱ्यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र राहणार आहे. भारत निवडणूक आयोगाने या वर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिले आहे मतदारसंघांमध्ये एकूण 533 दिव्याग व 85 वर्षांवरील मतदार असून त्यापैकी 502 मतदारांनी आपल्या गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. एका मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष एक सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष एक मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन शिपाई आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका बी एल ओ आणि पोलीस शिपाई दोन असे किमान दहा कर्मचारी राहणार असून एकूण 3710 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदान साहित्य व कर्मचारी यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी 48 बसेस व नऊ जीबी यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीतथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिले आहे.