महापूजेपूर्वी जिल्हाधिरी यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी

स्वच्छता मोहीम व्यवस्थितपणे राबवण्याबाबत सूचना

महापूजेपूर्वी जिल्हाधिरी यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी
महापूजेपूर्वी जिल्हाधिरी यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी

महापूजेपूर्वी जिल्हाधिरी यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी

पंढरपूर, दिनांक 17- आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी अनेक सोयी सूविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाद्वार, कुंभार घाट व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छतेची पाहणी केली व संबंधित अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना दक्ष राहण्याबाबत निर्देशित केले.

   यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या परिसरातील रस्ते व शौचालयाची स्वच्छता पाहणी करून पंढरपूर नगर परिषदेचे स्वच्छतेचे अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना स्वच्छता मोहीम व्यवस्थितपणे राबवण्याबाबत सूचित केले. रस्त्याच्या कडेची घाण, शौचालय स्वच्छ करणे, रस्त्याची साफसफाई करणे व शौचालय मधील विस्टा तात्काळ सक्शन मशीनच्या माध्यमातून काढून परिसरा बाहेर घेऊन जाणे याबाबतची माहिती घेऊन संबंधितांनी महाद्वार, कुंभार घाट परिसर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता राहणार नाही या अनुषंगाने तत्परता बाळगावी असे सांगितले.   यावेळी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री. वाघमारे व साफसफाई कर्मचारी उपस्थित होते.