आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणुकीची कामे काळजी पूर्वक करावी.

नोडल अधिकाऱ्यांची बैठक

आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणुकीची कामे काळजी पूर्वक करावी.

आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणुकीची कामे काळजी पूर्वक करावी.

 प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

सचिन इथापे

 पंढरपूर, दि:14- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकारी यांनी निवडणुकीचे कामकाज करतांना आदर्श आचारसंहितेचे पालन करुन सोपवलेली जबाबदारी काळजीपूर्वक लक्ष देवून पारदर्शक व निर्भयपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, निवडणुक नायब तहसिलदार वैभव बुचके, जयश्री स्वामी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, चंद्रकांत हेडगिरे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, तहस‍िलचे राजेश सावळे, आर.आर. शिंदे तसेच संबधित नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.

       यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, येत्या काही दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानुसार आदर्श आचारसंहिताही लागू होईल. या काळात निवडणूकविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. आयोगाने आदर्श आचारसंहिता पालन व्हावे, या दृष्टीकोनातून विविध सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्या सूचनांनुसार निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे. निवडणूक आयोगापर्यंत प्राप्त तक्रारींवर तक्रारदारांना तत्काळ प्रतिसाद देऊन तक्रारींचा निपटारा करावा. मतदान केंद्रांवर काही त्रुटी असल्यास सोयी सुविधांचा अभाव याबाबत माहिती घ्यावी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्राची रचना असेल, असे पहावे अशा सूचनाही प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

           निवडणूकविषयक कामकाजास सर्वच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. सर्व कक्षांच्या समन्वय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून प्रत्येक समन्वय अधिकाऱ्याने निवडणूकविषयक कामांचे योग्य नियोजन करावे.असे सांगून, आदर्श आचार संहिता, सी-व्हिजील, माहीती व तंत्रज्ञान पथक, विविध परवान्‌या देणेसाठी एक खिडकी कक्ष खर्च नियंत्रण पथक, टपाली मतपत्रिका, व्हीडीओ पाहणी पथक कामकाज आदी निवडणूक कामकाजाबाबत प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी आढावा घेतला.