भाजप पक्ष महाराष्ट्रातील लोकसभेला 25 ते 30 जागा जिंकेल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी भोवणार

भाजप पक्ष महाराष्ट्रातील लोकसभेला 25 ते 30 जागा जिंकेल.
केंद्रात व राज्यांमध्ये गेली दहा वर्षापासून भाजप पक्षाचे सरकार कार्यरत आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मार्गदर्शनाखाली सध्या केंद्र व राज्याच्या विकासामध्ये मोदी सरकारने विकासकामे असतील काही शासकीय कामात बदल घडून आणले असले तरी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मात्र नाराज आहे त्यामुळे सध्याच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात भाजपाने 45 जागा जिंकण्याचा दावा केला आहे तो मात्र खोटा ठरणार आहे हे मात्र नक्की आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व काही नागरिक व्यापारी जीएसटी, शेतकऱ्यांच्या खत औषध यावर लावण्यात आलेली जीएसटी संदर्भात तमाम शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे प्रत्यक्षदर्शी ऐकण्यात येत आहे. देशातील व महाराष्ट्रातील शेतकरी हा देशाचा कणा समजला जातो कारण शेतीमध्ये पिकलेल्या विकलेल्या धान्य व विविध कडधान्य फळे इत्यादी मोठ्या प्रमाणात शेतीत माल तयार झाल्यानंतर तो थेट बाजारपेठेमध्ये जातो आणि देशाच्या आर्थिक विकास साधण्यासाठी मदत होते व त्या आर्थिकवरच देशाची बाजारपेठ व देशातील आर्थिक व्यवहार देवानघेवान मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यामुळे शेतकरी हाच खरा देशाचा कना मानला जातो. परंतु मोदी सरकारने काही महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये कांदा अधिक पिकतो व कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव ची ओळख आहे त्या ठिकाणचा कांदा निर्यात बंदी केल्यामुळे तेथील शेतकरी व कांदा व्यापारी फार मोठे संकटात सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पक्षाला लोकसभेला याचे मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार यांची तारेवरची कसरत सध्या सुरू असून निवडून येईल असा स्वतःलाही विश्वास लागत नाही अशी अवस्था महाराष्ट्र मध्ये झाली असल्यामुळे भाजपाच्या लोकसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी पराभवास उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा मतदारसंघांमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असल्याने थोडक्यात मतावरच उमेदवार निवडून येतील असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सन 2024 च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात भाजप पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा केला आहे तो खोटा ठरणार आहे हे मात्र सत्य आहे.