सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित;

प्रस्ताव सादर न केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई

सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित;

सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा . आपल्याकडे आलेल्या प्रस्तावाची माहिती द्या आरोग्य विषयीची माहिती सेन्सिटिव्ह आहे याकडे जाणून-बुजून डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी शितल जाधव यांनी लेखी आदेशाचे पालन न केल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या, तात्पुरत्या स्वरूपात बदल यामुळे खऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत होता . याचप्रमाणे कोरोना काळातील रुग्णालयासाठी रुग्णोपयोगी साहित्य तसेच औषधांची आणि टेस्टिंग किट यांच्या खरेदीतील वारंवार केलेली अनियमितता आणि संधिग्दता निदर्शनाला आणण्याचे काम आणि याचा सातत्याने पाठपुरावा पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊप्रक्षाळे 

सोलापूरचे संपादक संजय पवार यांनी केला. विभागीय आयुक्त तसेच आरोग्य मंत्रालय आणि पंचायत राज समितीमध्ये हरिभाऊ प्रक्षाळे यांनी हा मुद्दा लावून धरला होता. याचाच प्रत्यय म्हणून आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी सखोल चौकशी करून हा निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना न्याय मिळाल्यामुळे नवीन आरोग्य अधिकारी चांगले आणि रुग्णोपयोगी हिताचे कार्य करतील हीच अपेक्षा.             

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शासन स्तरावरील प्रशासनाकडून वारंवार पत्र देऊन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.