महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात

पत्रकारांचे आडी अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणारu

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी न्यूज 18 लोकमतचे विरेंद्रसिंह उत्पात यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सदरची निवड ही संघाचे मार्गदर्शक हरिभाऊ प्रक्षाळे, महेश खिस्ते, सुनील दिवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध विषयावर कार्यशाळा,बदललेल्या कायद्यावर मार्गदर्शन शिबिर तसेच पत्रकारांचे आडी अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विरेंद्रसिंह उत्पात यांनी दिली. यानंतर पंढरपूर शहर कार्यकारणी नूतन अध्यक्ष यांनी जाहीर केली. यामध्ये कार्याध्यक्षपदी पुढारी न्युज चे माऊली डांगे, उपाध्यक्षपदी टीव्ही 9 चे रवी लव्हेकर व दैनिक महासत्ताचे दिनेश खंडेलवाल, सचिवपदी दैनिक एकमत चे अपराजित सर्वगोड, सहसचिवपदी दैनिक ललकारचे विकास पवार, कोषाध्यक्षपदी पंढरी वार्ता चे संपादक राजकुमार शहापूरकर, प्रसिद्धी प्रमुख पदी सोहम जैयस्वाल, कार्यकारणी सदस्य पदी दैनिक संचार चे विनायक हरिदास, दैनिक लोकमतचे सचिन कांबळे, दैनिक नवराष्ट्र चे नवनाथ खिलारे तर सदस्य पदी दत्तात्रय देशमुख गणेश महामुनी यांची निवड करण्यात आली. सदरच्या निवडीनंतर नूतन अध्यक्ष यांचा सत्कार मार्गदर्शक हरिभाऊ प्रक्षाळे, महेश खिस्ते यांच्या हस्ते करण्यात आला तर सर्व उपस्थितांचे व पदाधिकाऱ्यांचे नूतन अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.