जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी

सचिन इथापे यांनी स्ट्रॉग रुम येथील व्यवस्थापन, सुरक्षा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी

   पंढरपूर, दि.05:- जिल्ह्यातील 42 -सोलापूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रुमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देवून सुरक्षेची व उपलब्ध सोयी- सुविधांची पाहणी केली.यावेळी प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी सचिन इथापे, तहसिलदार तथा अति. सहा निवडणूक अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, योगेश कदम, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, चरण कोल्हे, नायब तहसिलदार चंद्राकंत हेडगिरे, मनोज श्रोत्री, वैभव बुचके, पंडीत कोळी यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

       यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, स्ट्रॉग रुम येथील सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त व्यवस्था, निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा याबाबतची माहिती घेतली. तसेच स्ट्रॉग रुम व्यवस्थापन व नियोजनाबाबत आढावा घेवून आवश्यक सूचना दिल्या. त्याचबरोबर स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेबाबत योग्य दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या  . यावेळी प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी स्ट्रॉग रुम येथील व्यवस्थापन, सुरक्षा, निवडणूकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा, वाहतुक व्यवस्था, मतदान केंद्रावरी सुविधा याबाबत माहिती दिली.