प्रशासनाची करडी नजर 1 लाख 96 हजार रुपये किंमतीचा भेसळयुक्त पेढा अन्न व औषध प्रशासनमार्फत पंढरपूर शहरात जप्त”

आषाढी वारी अनुषंगे अन्न व औषध प्रशासन, सोलापूरचे सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर,

प्रशासनाची करडी नजर 1 लाख 96 हजार रुपये किंमतीचा भेसळयुक्त पेढा अन्न व औषध प्रशासनमार्फत पंढरपूर शहरात जप्त”

प्रशासनाची करडी नजर 1 लाख 96 हजार रुपये किंमतीचा भेसळयुक्त पेढा अन्न व औषध प्रशासनमार्फत पंढरपूर शहरात जप्त

दिनांक ०८/०७/२०२२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आषाढी वारी अनुषंगे अन्न व औषध प्रशासन, सोलापूरचे सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर, श्री. उमेश भुसे, श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती नंदिनी हिरेमठ व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कासार घाट , पंढरपूर येथील कुमार खोत,, महादेव खोत,,,संगप्पा खोत यांचे अस्थायी पेढा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे वाहन क्र MH 11, AG 9261 या वाहनातून विक्रीस आणलेल्या पेढ्याचा संशय आल्याने सदर पेढ्यात जागेवर आयोडीन टाकून पाहिले असता सदर पेढ्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. एकूण 490 किलो, किं. रु. 196000/- चा साठा जप्त करुन सदर पेढा भेसळ युक्त असल्याने जागेवर नष्ट करण्यात आली. सदर प्रकरणी भा द वी कलम 272 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे चालू आहे.

सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर, श्री. यु. एस. भुसे, श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती नंदिनी हिरेमठ, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांच्या पथकाने पुर्ण केली.