मतदान जागृतीबाबत पंढरपूर येथे सायकल व मोटार सायकल रॅली उत्साहात

पंढरपूर शहरात सायकल व मोटार सायकल रॅलीचे आयोजन

मतदान जागृतीबाबत पंढरपूर येथे सायकल व मोटार सायकल रॅली उत्साहात

मतदान जागृतीबाबत पंढरपूर येथे सायकल व मोटार सायकल रॅली उत्साहात

पंढरपूर..दि.05:- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमातंर्गत 42- सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम सुरु आहेत. या अनुषंगाने पंढरपूर शहरात सायकल व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  पंढरपूर शहरातील मतदारांमध्ये मतदान जागृती व्हावी तसेच मतदान करणे आपला हक्क आहे ही जाणीव करून देण्यासाठी सदरची रॅली काढण्याचा उद्देश होता. नगरपरिषद पंढरपूर, श्री विठ्ठल -रुक्मिणी योग प्राणायाम संस्था, सूर्योदय परिवार, लायन्स क्लब , इनरव्हील पर्ल्स क्लब पंढरपूर,पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन , रनर्स असोसिएशन पंढरपूर आणि पंढरपूर सायकलर्स क्लब तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर, निमा डॉक्टर्स पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायकल व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, स्वीप नोडल अधिकारी समाधान नागणे,उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, रोटरी क्लबचे भारत ढोबळे, रनर्स ग्रुपचे अध्यक्ष महेश भोसले उपस्थित होते.

 रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक- सावरकर चौक- इंदिरा गांधी चौक- अर्बन बँक- भादुले हौद चौक -नाथ चौक -प्रदक्षिणा मार्गे काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थाचे उपाध्यक्ष रवींद्र कोडग सचिव प्रशांत आगावणे, दिव्या स्पोर्ट्स ग्रुपचे महेश गावडे , निमा अध्यक्ष अमरसिंह जमदाडे, निमा वुमन्स फोरम सचिव अश्विनी साळुंखे, सिंहगड कॉलेज प्रिन्सिपल करंडे, केमिस्ट असोशिएनचे प्रशांत खलिफे ,रनर असोसिएशनचे श्री ढोबळे, होमिओपॅथी संघटना डॉ.संगीता पाटील, लायन्स क्लबचे आरती बसवंती,रा पा कटेकर,विवेक परदेशी इनरव्हील क्लबच्या अनुराधा हरिदास यांनी सहभाग घेतला होता.