अतुल जिनदत्त शहा बारामती "महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार" पुरस्‍काराने सन्‍मानित.

महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार

अतुल जिनदत्त शहा बारामती "महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार" पुरस्‍काराने सन्‍मानित.

अतुल जिनदत्त शहा बारामती "महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार" पुरस्‍काराने सन्‍मानित.

मुंबई - . अतुल जिनदत्त शहा, बारामती यांना विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील ऊत्कृष्ट कार्याबद्दल राजभवन, मुंबई येथे झालेल्‍या समारंभात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सन्मा. श्री रमेशजी बैस यांच्या शुभहस्ते *"महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार"* प्रदान करून गौरवण्‍यात आले. संपूर्ण समाजात ज्‍या व्‍यक्‍तींनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात लक्षणीय कार्य केले आहे अशा महनीय व्‍यक्‍तींच्‍या कार्याचा गौरव दरवर्षी सपना सुबोध सावजी ट्रस्टच्या वतीने करण्‍यात येतो. यामध्ये भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा, फिल्म अभिनेता श्री सचिन पिळगावकर व अन्य विशेष प्रभूतीना व बारामती येथील चंदूकाका सराफ ज्वेल्स चे मालक व कुसुम व जिनदत्त शाह वेल्फेअर फाउंडेशन बारामती संचालित दयोदय गोशाळेचे अध्यक्ष श्री अतुलजी शहा तसेच बारामती येथील डॉक्टर दीप्ती सतीश पवार ह्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. यावर्षी विविध क्षेत्रातील ३५ महनीय व्‍यक्‍तींची निवड करण्‍यात आली होती . श्री. अतुलजी शाह यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे नियोजनबद्ध उपक्रम राबविले जातात. गोसेवा व गोमाता संरक्षणसाठी *'दयोदय"* गोशाळेची स्थापना करून गायींचे गोबर व गोमूत्र पासून "स्वर्णामृतचे" उत्पादन सेंद्रिय शेतीसाठी केले जाते आणि मानवाला विषमुक्त अन्न मिळण्यासाठी यांचा प्रचार व प्रसार करून मागील चार वर्षापासून हा उपक्रम राबवित आहेत.  याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करताना श्री. अतुल शहा म्हणाले की, परम पूजनीय आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असून या कार्यात सौ. संगीता शाह व माझे सर्व सहकारी यांचेही योगदान आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. सुबोधजी सावजी, सपना सुबोध सावजी ट्रस्टचे अध्‍यक्ष डॉ. राहुल सावजी, सौ. संगीता अतुल शहा व अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.