पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न 

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न 

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न 

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न 

पंढरपूर दिनांक 14 डिसेंबर पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग कार्यशाळा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मारक राष्ट्रमाता जिजामाता उद्यान येथे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर , सहा. कर प्रशासकीय अधिकारी सचिन मिसाळ, प्रहार जिल्हा अपंग संघटना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौगुले, शहराध्यक्ष गणेश ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती यावेळी बोलताना उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी सांगितले की , शासन प्रत्येक शहरातील दिव्यांग हा सक्षम झाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्नशील असून शासन निर्देशानुसार पंढरपूर परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना सायकल, काठी व इतर अनुषंगिक उपकरणे दिलेले आहेत तसेच प्रत्येक वर्षी दिवाळीपूर्वी प्रत्येक दिव्यांगाना नगर परिषदेच्या 5% दिव्यांग राखीव निधी मधून प्रति वर्षी रुपये 4000 दिले जातात गेल्या दोन वर्षात 350 दिव्यांगाना सुमारे वीस लाख रुपये निधी वाटप करण्यात आल्याचे सांगितले तसेच शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी ज्या योजना लागू केले आहेत त्याची माहितीही या कार्यशाळेच्या निमित्ताने दिली तसेच नगर परिषदेने दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र सहाय्यता कक्ष निर्माण केला असून त्या ठिकाणी स्वतंत्र लिपिकाची नियुक्ती केली आहे तसेच दिव्यांगाच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सांगावेत असे आवाहन केल्यानंतर श्री रवींद्र गायकवाड, सागर अष्टेकर यांनी दिव्यांगाच्या अडचणी सांगितल्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व दिव्यांगाचे स्वागत कर प्रशासकीय अधिकारी सचिन मिसाळ यांनी केले आभार अंधशाळा मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी मानले या कार्यक्रमास दिव्यांग सहाय्यता कक्ष लिपिक अविनाश ईश्वरकट्टी व लिपिक संतोष ऐतवाडकर, वसतिगृहाचे प्रतिनिधी थोरात सर, हुंगे, बनसोडे, डांगे, हरिदास, वाघमारे हे उपस्थित होते