चंद्रकांत पाटील यांची मंगळवेढा येथे प्रतिमा जाळली

चंद्रकांत पाटील यांची मंगळवेढा येथे प्रतिमा जाळली

चंद्रकांत पाटील यांची मंगळवेढा येथे प्रतिमा जाळली

चंद्रकांत पाटील यांची मंगळवेढा येथे प्रतिमा जाळली

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - डी. के. साखरे

मंगळवेढा सोमवार दिनांक 12 डिसेंबर -: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल जाणीवपूर्वक अपमानास्पद वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मुजोर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री   चंद्रकांत  पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोशारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे यांनी केली.
          महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवीन्याकारिता  काल सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी पक्षाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो  आंदोलन करून दहन करण्यात आले त्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना साखरे यांनी ही मागणी केली. पुढे बोलताना साखरे म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी दिलगिरी व माफी मागणे यात फरक आहे. दिलगिरी व्यक्त करत असताना देखील  त्यांनी मुजोरपणा दाखवला आहे. शिंदे फडणवीस सरकारने  चंद्रकांत पाटील यांना पाठीशी न घालता महाराष्ट्रामध्ये  कायदा व सुव्यवस्था राहील याची दक्षता घ्यावी.
              यावेळी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद्मिनी शेवडे, भटक्या सेलचे जिल्हा अध्यक्ष भाई रवींद्र काळे, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे, मंगळवेढा शहर अध्यक्ष राहुल लोखंडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, पंढरपूर शहर महिला अध्यक्ष मंगल कांबळे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळवेढ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.