पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे माध्यमिक उच्च माध्यमिक रखडलेल्या प्रश्नावर बैठक संपन्न
पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे माध्यमिक उच्च माध्यमिक रखडलेल्या प्रश्नावर बैठक संपन्न
पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे माध्यमिक उच्च माध्यमिक रखडलेल्या प्रश्नावर बैठक संपन्न
विविध विषयावर चर्चा होऊन अनेक प्रश्न मार्गी
पुणे सोमवार दि..28 नोव्हेंबर पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंतराव आसगावकर सर व प्रा. सुभाषराव माने सर माजी अध्यक्ष मुख्याध्यापक महामंडळ, राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक मा. श्री. कृष्ण कुमार पाटील साहेब, शिक्षण सहसंचालक हरून आत्तार साहेब, उप शिक्षण संचालक श्री. औदुंबर उकिरडे साहेब, प्राथमिक शिक्षण उपसंचालक कुल्लाळ साहेब, शिक्षक लोकशाही आघाडीचे श्री. झाडबुके सर, श्री. अण्णासाहेब गायकवाड सर, श्री. रामचंद्र जानकर सर, पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. श्री. श्रावण बिराजदार सर, प्राध्यापक सचिन कदम सर, प्राध्यापक बापुराव वाघमोडे सर, व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बरोबर खालील विषयावरती आज दिनांक 28/ 11/ 2022 वार- सोमवार रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे दुपारी ठीक १ वाजता खालील विषयावरती चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. विषय क्रमांक १) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे शालार्थ प्रकरणे रखडले बाबत.२) सन 2008 नंतरच्या शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान मिळणे बाबत,३) प्राथमिक वरून प्राथमिक मध्ये विनाअनुदानित व वरून अनुदानित वर घेणेबाबत, ४)ज्युनिअर कॉलेजचे व माध्यमिक विद्यालयाचे सेवक संचामध्ये त्रुटी आढळलेल्या पूर्ण करणे बाबत व नवीन सेवक संच देणे बाबत,५) पेंडिंग मेडिकल बिले व पेंडिंग बिले त्वरित वेतन विभागाकडून मिळणेबाबत, ६)रयत शिक्षण संस्थेचे संस्थेमधील विनाअनुदानित ते अनुदानित मान्यता देणे बाबत अशा विविध विषयावरती चर्चा होऊन अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले व संबंधितांना तशा सूचना देण्यात आल्या.