संविधान हाच भारताचा धर्म ग्रंथ -- ॲड. राजस खोबरागडे

भारतीय संविधान हा मानवी कल्याणाचा सुंदर दस्त असून तोच भारताचा धर्म ग्रंथ

संविधान हाच भारताचा धर्म ग्रंथ -- ॲड. राजस खोबरागडे

संविधान हाच भारताचा धर्म ग्रंथ -- ॲड. राजस खोबरागडे

मंगळवेढा दि.. 27 नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा मानवी कल्याणाचा सुंदर दस्त असून तोच भारताचा धर्म ग्रंथ आहे असे प्रतिपादन दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचे नातू व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते 

ॲड. राजस खोबरागडे यांनी केले. ते डोंगरगाव तालुका मंगळवेढा येथे रमाई फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान समारंभात अध्यक्ष पदावरून बोलोत होते. 

     पुढे बोलताना ते म्हणाले की , आपल्या देशा मध्ये विविध धर्माचे लोक राहत असून त्यांचे धर्म ग्रंथ वेगवेगळे आहेत. परंतु त्या विविधते मध्ये एकता साधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे या देशा वर अनंत उपकार असून 15 ऑगस्ट व 26 जानेवारी ह्या दोन दिवसा इतकेच संविधान दिनाला महत्त्व आहे.

कार्यक्रमाचे प्रारंभीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापण करून संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबारागडे यांचे नातू आपल्या गावात येणार असल्याचे समजताच डोंगरगाव चे ग्रामस्थ व आजूबाजू च्य पचप्रोसितील लोक मोठ्या कुतूहराणे जमा झाले होते. त्या वेळेस डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने राजस खोबरागडे यांचा मनाचा फेटा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व वातावरण भावुक झाले होते. शिवसेना ज्येष्ठ नेते नारायण गोवे , महाराष्ट्र 

नवनिर्माण सेने चे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, मंगळवेढाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड. भारत पवार, भाजपा ओबीसी सेल चे प्रदेश सचिव विवेक खेलारे, डोंगरगाव चे सरपंच शंकरराव मेतकरी, शंकर आकळे, उपसरपंच गनीम पठाण, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले, महिला आघाडीच्या पद्मिनी शेवडे, वैशाली चंदनशिवे, तालुका अध्यक्ष समाधान भोसले, यांचासह मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ उपस्थित होते. ह्या कार्यक्रमा नतर डोंगरगाव प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यानी ॲड. राजस खोबरागडे ह्यांचा सत्कार केला तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. पुढे बोलताना खोबरागडे म्हणाले की शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे साधन असून शिक्षणा मुळेच माणसात बदल होतो.डोंगरगाव चा ग्रामस्तानि माझा केलेला सत्कार व दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलोअसून ह्या गावचा मी कायम ऋणी राहीन.कार्यक्रमाचे सूत्र संचनलन कविता वाघमारे मॅडम यांनी केले व मुख्यध्यापक विश्वनाथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला...