श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव नवनाथ बावचे यांचा अनोखा वाढदिवस साजरा.

ढदिवसानिमित्त अनिलनगर येथील गोरगरिबांच्या शालेय विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप

श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव नवनाथ बावचे यांचा अनोखा वाढदिवस साजरा.

श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव नवनाथ बावचे यांचा अनोखा वाढदिवस साजरा.

पहिली ते तिसरीच्या 100 विद्यार्थ्यांना वही व पेनचे केले वाटप.

श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव नवनाथ बावचे यांनी सध्या सुरू असणाऱ्या श्री गणेश उत्सवाचे आणि वाढदिवसाचे संधी साधत अनिल नगर येथील गरीब शालेय विद्यार्थ्यांना पेन वहीचे वाटप केले आहे. अनिल नगर येथील इंडियन गणेश मंडळ या ठिकाणी शिक्षक नवनाथ बावचे यांची गणेश मंडळाने सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सपत्नीक पूजा ठेवण्यात आली होती.शिक्षक नवनाथ बावचे हे मूळचे अनिल नगरचे रहिवासी असून त्यांनीही बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज एका सोलापूर जिल्ह्यातील वाघोली वाडी येथील श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या घरची कौटुंबिक परिस्थिती मध्यमच असल्याने त्यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे मनामध्ये ध्येय बाळगून एका शिक्षण संस्थेचे सचिव झाले आहेत. परिस्थितीची जाणीव ठेवत समाजामध्ये आई-वडिलांचे नाव उज्वल करण्यास यश मिळवले

केवळ वही आणि पेनामुळे मी आज श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे काम पाहत असताना मोठा आनंद होतआहे श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था वाघोली वाडी येथील पहिली ते बारावी पर्यंतचे 500 विद्यार्थी आहेत. एवढी मोठी जबाबदारी पेलवत असताना परिस्थितीची जाणीव आजही ठेवली असल्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चांगले देत आहेत त्याचबरोबर आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलनगर येथील गोरगरिबांच्या शालेय विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप केले आहे. आज वाढदिवसानिमित्त इंडियन श्री गणेश मंडळ येथील श्री गणरायाची सपत्नीक पूजा केली आहे .

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक प्रदेशसहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे उपस्थित होते. याप्रसंगी अनिल नगर येथील ज्येष्ठ भारत जाधव सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे,शंकर पवार निखिल गंगेकर. मदन बोंडफळे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे ,इंडियन श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश आगवणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.