पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रम

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्र राबवण्याबाबत शहरातील मुख्याध्यापक व शिक्षक यांची बैठक संपन्न

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्यसंग्रमातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 22 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे या निमित्ताने उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालय मधील मुख्याध्यापक यांची बैठक कवठेकर हायस्कूल येथे पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अँड सुनील वाळूजकर नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेश पवार, कवठेकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अंजली बारसोडे तसेच कवठेकर प्रशाला प्रमुख संचालक सुधीर पटवर्धन सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोलताना प्रशासन अधिकारी महेश पवार यांनी सांगितले की केंद्र शासन व राज्य शासनाने या उपक्रमाद्वारे शहरातील प्रत्येक घरावर झेंडा लावण्यासंबंधी भूमिका घेतली आहे त्यानुसार सर्व मुख्याध्यापक यांनी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी असे आवाहन केले तसेच उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की केंद्र शासन व राज्य शासनाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या गौरवशाली पर्वा निमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केले आहे त्यानुसार राज्यात 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढायच्या स्मृति कायम तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी लोकांच्या मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव देशभरात हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून त्यामध्ये प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनावर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन लावणेसाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत हा उपक्रम पोहोचण्याच्या दृष्टीने प्रसिद्धी करावी यामध्ये प्रामुख्याने सामाजिक व सार्वजनिक संस्था, मंडळे शाळा महाविद्यालय यांच्या माध्यमातून जाणीव व जागृती कार्यक्रम हाती घेऊन हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा 

केंद्रीय गृह विभाग यांच्या 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/ पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क /खादीपासून बनवलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केलेला आहे त्यानुसार हा ध्वज वापरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे संगीतातून ही राष्ट्रध्वजा बाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करणे बाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार हर घर झेंडा या उपक्रमांचे अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी मात्र हे करत असताना भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते व अजाणते पणे राष्ट्रध्वजाचा कोणत्याही परिस्थितीत अपमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करावी लागेल हा आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम हे शाळा महाविद्यालय च्या माध्यमातूनच शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे होऊ शकते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी पालकांशी संपर्क साधून प्रत्येक घरावर झेंडे लावले जातील याबाबत आपण सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच हा उपक्रम राबवत असताना राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने शिबिरे चर्चासत्राची ही आयोजन करून हा राष्ट्रीय उपक्रम आपण सर्वांनी यशस्वी करावा असे आवाहन यावेळी केले यावेळी सर्वांचे स्वागत व आभार नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे शिक्षक रामचंद्र बोंडरे यांनी केले