पंढरपुरातील लॉजवर छापा; देह विक्री कारण्यासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका...

चार महिलांची शनिवारी सुटका

पंढरपुरातील लॉजवर छापा; देह विक्री कारण्यासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका...

पंढरपुरातील लॉजवर छापा; देह विक्री कारण्यासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका...

पंढरपूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकून देह विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या चार महिलांची शनिवारी सुटका केली आहे.पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी प्रमाणे, उषा बापू आलदर (वय २९, रा. प्रतिभाताई नगर, पंढरपूर मुळ, रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा ), युवराज शंकर पवार, वर्षा युवराज पवार (दोघे रा. हॉटेल विशालच्या मागे, सद्गुरू मंगल कार्यालयाजवळ, वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांनी हॉटेल विशालच्या मागील बाजूस खोल्या बांधल्या आहेत. त्या खोल्यांना लॉज करीता परवाना नाही. त्या खोल्यांचा लॉजप्रमाणे वापर सुरू केला आहे. तसेच त्या ठिकाणी चार या महीलांना स्वतःचे फायद्याकरीता हॉटेल विशालच्या मागील लॉजमध्ये आणुन त्यांना थांबवून ठेवून, आश्रय देवून देह विक्री व्यवसायाकरीता ग्राहक आणून देत होते.त्या महीलांकडून वेश्याव्यवसाय करून, त्या कमाईवर उदरनिर्वाह करून, स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सार्वजनीक ठिकाणाच्या आसपास देह विक्री चालवित असताना मिळून आले. म्हणून त्या तिघांविरुद्ध सरकारतर्फे भादविकलम ३७०,३४ सह अनैतीक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे सपोनि विक्रम वडणे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोनि हुंबे करत आहेत. पिडीत महिलांना न्यायालयात हजर केले. यानंतर त्या महिलांना महिला सुधार गृहात पाठविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधिश श्रीमती पी.बी.घोरपडे यांनी दिले. यावेळी पिडीत महिलांच्या बाजून ॲड.किर्तीपाल सर्वागोड यांनी काम पाहिले आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शानाखाली असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या पथकाने केली आहे.