जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
प्र.व्यवस्थापक मुकेश अनेचा यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री श्री महाजन यांचा सन्मान

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर, दि-२६ :- राज्याचे जलसंपदा (विदर्भ तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने लेखाधिकारी तथा प्र.व्यवस्थापक मुकेश अनेचा यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री श्री महाजन यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी जलसंपदामंत्री श्री. महाजन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी लेखाधिकारी तथा प्र.व्यवस्थापक मुकेश अनेचा यांनी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.