पंढरपुरात कोयत्याने चौघांनी केला एक जनावर जीवघेणा हल्ला.

पंढरपूर इस्कॉन मंदिराच्या कामावरून वाद

पंढरपुरात कोयत्याने चौघांनी केला एक जनावर जीवघेणा हल्ला.

पंढरपुरात कोयत्याने चौघांनी केला एक जनावर जीवघेणा हल्ला.

हल्ल्यात एक जण जबर जखमी

जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ उपचार केले असून सध्या त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

पंढरपूर येथील काळा मारुती परिसरात आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिनेश धोंडीबा देवमारे हा जात असताना वैभव कांबळे अंदाजे वय वर्ष 20 राहणार नदीपलीकडे शेगाव दुमाला हद्द यांनी व त्याच्या तीन साथीदारांनी श्री दिनेश देवमारे यांच्या हातावर छातीवर डोक्यात कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले आहे.

सदर घटनेची माहिती घेतली असता श्री दिनेश देवमारे आणि कोयत्याने मारहाण करणारा वैभव कांबळे याची आई आशाबाई कांबळे हे दोघेजण चंद्रभागा नदी काठावरील नदीपलीकडे इस्कॉन मंदिरात एकाच ठिकाणी कामाला आहेत. या अगोदर वैभव कांबळे यांनी दिनेश देवमारे यांना मला इस्कॉन मंदिरात कामावर घ्या म्हणत होता परंतु दिनेश देवमारे हा इस्कॉन संस्थेमध्ये कामाला घेणे हे माझ्या हातात नाही तू इस्कॉनच्या जबाबदार किंवा कामाला ठेवणारे इसम आहे त्यांना विचार असे सांगितले असता याच बोलण्याचा राग वैभव कांबळे यांनी मनात धरून श्री दिनेश देवमारे यांना चौघानी मिळून कोयत्याने जबर मारहाण केली आहे. जबर जखमी श्री दिनेश देवमारे यांच्यावर सध्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये किरकोळ उपचार केले आहेत परंतु पुढील उपचार घेण्यासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाले आहे .सदर घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी पुढील चौकशी करून कारवाई सुरू केली आहे.