प्रांताधिकारी श्री गजानन गुरव यांनी सरगम चौकातील रेल्वे रुळा नजीक उंच बॅरिकेटेडची  केली पाहणी.

सरगम चौका जवळील रेल्वे रुळावरून जाणारा जुना रस्ता आहे. त्या रस्त्यावरूनच सर्व संतांच्या पालख्या शहरात मंदिराकडे मार्गस्थ होत असतात

प्रांताधिकारी श्री गजानन गुरव यांनी सरगम चौकातील रेल्वे रुळा नजीक उंच बॅरिकेटेडची  केली पाहणी.

प्रांताधिकारी श्री गजानन गुरव यांनी सरगम चौकातील रेल्वे रुळा नजीक उंच बॅरिकेटेडची  केली पाहणी
कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंढरपूर आषाढी यात्रा व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे भाविकांना बंद होते. परंतु यावर्षी आषाढी यात्रा सोहळा होणारा असल्याने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत रेल्वे विभागाने कुर्डूवाडी ते पंढरपूर रेल्वे मार्ग विद्युत तारेवर चालणारी रेल्वे सुरू केली आहे. त्यामुळे येथील सरगम चौका जवळील रेल्वे रुळावरून जाणारा जुना रस्ता आहे. त्या रस्त्यावरूनच सर्व संतांच्या पालख्या शहरात मंदिराकडे मार्गस्थ होत असतात. या रेल्वे इलेक्ट्रिक विद्युतधारेचा संतांच्या पालख्यांना व वारकरी भाविकांना धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळेची दखल घेतली आहे. संतांच्या रथाच्या पालखीचे शेवटची उंची ही 13 फूट 9इंच असल्याने तेवढ्याच उंचीमध्ये पुढे जाण्यासाठी रेल्वे रुळालगत उंच बॅरिकेटेड करण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी श्री गजानन गुरव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दत्तात्रय गावडे सार्वजनिक बांधकाम उपाभियंता श्री मुखडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम रेल्वे विभागाचे इलेक्ट्रिक अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री घाडगे यांनी पाहणी केली आहे.