आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या वाहनांचा टोल माफ. मुख्यमंत्री
आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी भाविकांना टोल माफ मुख्यमंत्र्यांची घोषणा
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या वाहनांचा टोल माफ. मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांची घोषणा.
कोकणामध्ये गणेश भक्त जसे गणेश उत्सवाला जातात त्यांनाही त्यावेळी टोल माफ केला जातो. त्याच पद्धतीने पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याकरिता वारकरी भाविकांना आपल्या वाहनावर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्याच्या व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.