अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली गावाच्या तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे

महेश घंटे मित्र परिवाराकडून जाहीर सत्कार

अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली गावाच्या तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे

अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली गावाच्या तंटामुक्त अध्यक्षपदी संजय मणुरे यांची बिनविरोध निवड.

अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली येथील महेश घंटे यांनी संजय मनोरे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी., महेश घंटे मित्र परिवाराकडून जाहीर सत्कार करण्यात आला आहे.

 अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली हे महत्त्वाचे गाव व तालुक्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याच गावातील लोकप्रिय व सर्वांचे आवडते संजय खंडू मणुरे यांची गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. सदर बिनविरोध निवडीचे प्रसंगी मावळते तंटामुक्त अध्यक्ष भालचंद्र कांबळे, सरपंच भीमाबाई बनसोडे, उपसरपंच श्रीशैल माशाळे, पोलीस पाटील किरण सुरवसे, ग्रामसेवक कट्टीमनी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महेश घंटे मित्र परिवाराचे योगीनाथ जमादार, अब्दुल हदीमनी, राजकुमार करनाचे, शावर सिद्ध सुरवसे उपस्थित होते ‌. सत्काराचे प्रसंगी महेश घंटी यांनी माजी तंटामुक्ती अध्यक्षांनी गावातील तसेच तालुक्यातील तंटा मिटवून गावाचे नाव उज्वल केले आहे. नूतन विद्यमान अध्यक्ष हा आलेख नक्कीच वाढवतील अशी आशा व्यक्त केली. महेश घंटेच्या सत्काराला उत्तर देताना गावातील तसेच संपूर्ण तालुक्यातील तंटा आपण हद्दपार करू असा विश्वास अध्यक्ष संजय मनोर यांनी व्यक्त केला.