उद्या रविवार ७मे रोजी  खा. शरद पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा.

खासदार शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार

उद्या रविवार ७मे रोजी  खा. शरद पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा.

उद्या रविवार ७मे रोजी  खा. शरद पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा.

पंढरपूर शनिवार दि.6 मे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वेणूनगर गुरसाळे ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे खा. शरदचंद्रजी पवार  यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास  कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी सांगितले.

काही काळापूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने सोलापूर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली असल्याने अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले असल्याने पुन्हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय नेत्यांची वज्रमुठ कशी बांधायची याकडे खासदार शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी पुढील सन 2024 च्या लोकसभा ,विधानसभा निवडणुका डोळ्यात समोर ठेवून उद्या रविवार दिनांक 7 मे रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्रमाचे निमित्त साधून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांना नेमका कोणता कानमंत्र खासदार शरद पवार देणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत पाटील यांनी सन 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे अनेक वेळा त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे चेअरमन अभिजीत पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे व संचालक सभासद यांची संख्या मोठी असल्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांनी ठोस निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या होणारा दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर उद्या होणाऱ्या

 कार्यक्रमास हजारोच्या संख्येने राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी श्री विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, कल्याणराव काळे व युवराज पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .