पोलीस प्रशासनाची कारवाई: 58 संशियत चोरटे जेरबंद

तब्बल 58 संशयितांवर कारवाई करण्यात आली

पोलीस प्रशासनाची कारवाई: 58 संशियत चोरटे जेरबंद

पोलीस प्रशासनाची कारवाई: 58 संशियत चोरटे जेरबंद

कारवाईसाठी वारकरी वेशभुषेत पोलीसांची 10 पथक

उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम

पंढरपूर दि.(06)- कार्तिकी शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्यादर्शनासाठी मोठया प्रमाणात वारकरी, भाविक आले होते. या यात्रा कालावधीत काही चोरटयांचाही समावेश असतो. गर्दीचा फायदा घेवून चोरटे भाविकांच्या मौल्यवान वस्तू , पैसे लंपास करतात. या चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने 10 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने पंढरपूरामध्ये भाविकांच्या मौल्यवान वस्तूची चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तब्बल 58 संशयितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरी होण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेचे वारकरी वेशभुषेतील एकूण 10 पथके तयार केली होती. सदर पथकाने गोपनीय माहिती काढून वारीमध्ये चोरी करण्यासाठी येणाऱ्या जिल्हयातील, परजिल्हयातील तसेच परराज्यातील सोनसाखळी चोर व इतर चोरांच्या टोळीवर बारकाईने लक्ष ठेवून शहरातील सर्व गर्दीचे ठिकाणे, चंद्रभागा वाळवंट येथून तब्बल 58 संशयित इसम हे विविध ठिकाणी चोरी करण्याच्या तयारीत असताना तसेच संशयास्पद फिरत असताना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द सी.आर.पी.सी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 या कारवाईमुळे मोठया प्रमाणात भाविकांच्या मौल्यवान वस्तुंच्या चोरी होण्यापासून प्रतिबंध करण्यास यश आले आहे. तसेच वारी कालावधीत कोणत्याही मोठया चोरीच्या गंभीर घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे वारकरी भाविकांची कार्तिकह वारी सुखकर होण्यास मदत झाल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम यांनी सांगितले.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.