डोंगरगाव येथे महाराष्ट्र दिनी मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ
पहिल्याच दिवशी गावातील सुमारे 500 लोकांनी या मध्यान्ह भोजनाचा लाभ घेतला.

डोंगरगाव येथे महाराष्ट्र दिनी मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ
डोंगरगाव (ता. मंगळवेढा)-:महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधून मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ करण्यात आला आज पहिल्याच दिवशी गावातील सुमारे 500 लोकांनी या मध्यान्ह भोजनाचा लाभ घेतला.
या योजनेचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विवेक खिलारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खिलारे म्हणाले की शासनाच्या या योजनेमुळे गावगाड्यातील गरीब, कष्टकरी, कामगार, दलित व समाजातील दुर्बल घटकांना एक नवी ऊर्जा व जगण्याचा आधार मिळणार असून गावातील सर्व गरजू ग्रामस्थांनी आपल्या आधार कार्डाच्या प्रति डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही खिलारे यांनी केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे डी. के. साखरे, माजी सरपंच सचिन आकळे, माजी उपसरपंच गणिमभाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल साखरे, बाबा सय्यद, अमोल मेटकरी, संगम खडतरे, धोंडाप्पा मस्के,रामदास जाधव, नागेश नरळे, सिद्धेश्वर जठार, काशिनाथ सलगर, सुनील खडतरे, राजू बाबर, म्हमीलाल झेंडे, समाधान भोसले ,शब्बीर सय्यद, नाना शिंदे, सिद्धु झेंडे,मनोहर चौगुले, विक्रम साखरे,सिद्धेश्वर बाबर,दादा खिलारे, पोस्टमन गडदे,ज्ञानेश्वर साखरे,भिकन साखरे,सचिन मस्के, मैना झेंडे, मंगल वाघमारे, वैशाली चंदनशिवे,सखू साखरे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.