राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या पंढरीत.

राष्ट्रवादी पक्षाच्या राजकीय नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार नेमका कोणता कानमंत्र देणार

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या पंढरीत.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या पंढरीत.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उभारण्यात येणाऱ्या बायो सीएनजी प्रकल्पाचे पूजन उद्या रविवार सकाळी ठीक ९वाजता होणार. या प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते तर आ.श्री पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. मागील आठवड्यात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार शरद पवार यांना दिले होते. त्यावेळीच खासदार शरद पवार यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. नवीन कार्यक्रम प्रसंगी श्री विठ्ठल परिवारातील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार ओम राजे निंबाळकर माजी मंत्री दिलीप सोपल आमदार बबनदादा शिंदेआ. रवींद्र धंगेकर आ. कैलास पाटील. माजी आ. राजन पाटील आमदार संजय मामा शिंदे,आ. यशवंत माने , माजी आ. दत्तात्रय सावंत माजी आ दीपक आबा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणारा आहेत

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारणीपासूनच खासदार शरद पवार यांचे या कारखान्यावर लक्ष केंद्रित आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नुकतेच निवडणुका पार पडल्या आणि अभिजीत पाटील यांनी भरघोस मतांनी विजय होऊन चेअरमन पदी निवड झाली परंतु अभिजीत पाटील नेमके कोणत्या पक्षाचे हे अद्यापही सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील जनतेला नाही हे मात्र गोडबंगालच म्हणावे लागेल.

काही काळपूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने सोलापूर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली असल्याने अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले असल्याने पुन्हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय नेत्यांची वज्रमुठ कशी बांधायची याकडे खासदार शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी पुढील सन 2024 च्या लोकसभा ,विधानसभा निवडणुका डोळ्यात समोर ठेवून उद्या रविवार दिनांक 7 मे रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्रमाचे निमित्त साधून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांना नेमका कोणता कानमंत्र खासदार शरद पवार देणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत पाटील यांनी सन 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे अनेक वेळा त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे चेअरमन अभिजीत पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे व संचालक सभासद यांची संख्या मोठी असल्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांनी ठोस निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या होणारा दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर उद्या होणाऱ्या

 कार्यक्रमास हजारोच्या संख्येने राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी श्री विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, कल्याणराव काळे व युवराज पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .