वादळी वाऱ्यात पावसामुळे  पडझड झालेल्या घरांची आ. प्रशांतराव परिचारक यांनी केली पाहणी

नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील

वादळी वाऱ्यात पावसामुळे  पडझड झालेल्या घरांची आ. प्रशांतराव परिचारक यांनी केली पाहणी

वादळी वाऱ्यात पावसामुळे  पडझड झालेल्या घरांची आ. प्रशांतराव परिचारक यांनी केली पाहणी

संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना

मंगळवेढा तालुक्यातील   जल्याळ येथे अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने पडझड होऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी मा.श्री.आमदार प्रशांत परिचारक यांनी केली व प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.मंगळवेढा तालुक्यातील वादळीवाऱ्या मुळे फार नुकसान झाले घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी मा.श्री.आमदार प्रशांत परिचारक यांनी जाणून घेतल्या आणि नुकसानाचा आढावा घेतला.

या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त बांधवाना धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असा विश्वास दिला.