पंढरी नगरीची १००० अनुयायांकडून स्वच्छता
महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी नोंदवला सहभाग

पंढरी नगरीची १००० अनुयायांकडून स्वच्छता
महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी नोंदवला सहभाग
आषाढी यात्रेनंतर तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीची १००० अनुयायांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन नामदेव पायरी पासून ते संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता केली. निर्मळ वारी पंढरीची या उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये माहूरगडचे मठाधिपती तथा महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत राष्ट्रसंत सदगुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी आपल्या १००० अनुयायांना घेऊन ही स्वच्छता मोहीम पार पडली.या प्रसंगी विठुरायाच्या नगरीत दत्त नामाचा गजर करत सर्वांनी संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ करत कचरा गोळा करुन लगेच घंटागाडीत टाकण्यात आला.यावेळी पंढरपूरचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पंढरपूर तहसीलचे पुदलवाड,श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हे उपस्थित होते.
या स्वच्छता मोहीमेत सर्व दत्त भक्तांनी मनापासून श्रमदान केले.
स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी बिदनाळकर, बरबडेकर, आनंद दत्तधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील, प्रल्हाद देवडे सर, आशीर्वाद पाटील ,संतोष पाटील ,सावकार, नथू पाटील,यांच्या बरोबर सर्व महिला भगीनिंनी प्रयत्न केले.यानंतर राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांचे भक्ती सागर ६५ एकर परिसरात प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील पत्रकारांनी उपस्थित राहून समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकारांचा शाल श्रीफळ आणि एक झाडू देऊन सन्मान करण्यात आला.