दत्त विद्या मंदिर सुस्ते प्रशालेच्या प्राचार्य पदी प्रा.सुधाकर पिसे यांची नियुक्ती
सलग 28 वर्षे अध्यापनाचे कार्य करून सुस्ते प्रशालेमध्ये ते प्राचार्यपदी नियुक्त

दत्त विद्या मंदिर सुस्ते प्रशालेच्या प्राचार्य पदी प्रा.सुधाकर पिसे यांची नियुक्ती
प्रतिनिधी. श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेच्या नूतन प्राचार्य पदी संस्थेच्यावतीने प्राध्यापक सुधाकर पिसे यांची नियुक्ती करण्यात आली.संस्थेच्या विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे मराठी विषयाचे सलग 28 वर्षे अध्यापनाचे कार्य करून सुस्ते प्रशालेमध्ये ते प्राचार्यपदी नियुक्त झाले आहेत.यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक तथा पांडुरंग स.सा.कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अनिरुद्ध सालविठ्ठल यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर,सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ,सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलिम वडगावकर,जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,दिलीप घाडगे,मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर,प्रशालेचे पर्यवेक्षक रणजीत शिनगारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी जेष्ठ लिपिक राजकुमार ढगे, किरण बोधले, संजय निंबाळकर, बबन पवार तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.