रेणुका मनोहर सर देशमुख यांचे दुःखद  निधन

महिला मंडळ या संस्थेच्या त्या सेक्रेटरी, उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम

रेणुका मनोहर सर देशमुख यांचे दुःखद  निधन

रेणुका मनोहर सर देशमुख यांचे दुःखद  निधन

पंढरपूर दि.8  मार्च पंढरपूर येथील रेणूका मनोहर सरदेशमुख यांचे 63 व्या वर्ष दु खद निधन झाले आहे.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी येथील सेवानिवृत्त व्यवस्थापक श्री. मनोहर सरदेशमुख यांच्या पत्नी सौ.रेणूका यांचे दिनांक 8 मार्च 2025 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

पंढरपूर येथील महावीर नगर येथे कार्यरत असणाऱ्या महिला मंडळ या संस्थेच्या त्या सेक्रेटरी, उपाध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. या शाळेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.अतिशय सुस्वभावी, मृदुभाषी आणि संयमशील असलेल्या सौ. रेणुका यांच्या निधनाने पंढरपुरातील अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत.