महिला मंडळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

शाळेची सजावट पान पुलांच्या तोरणाने व रांगोळीने

महिला मंडळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

महिला मंडळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

शैक्षणिक वर्षे २०२३ २०२४ मधील महिला मंडळ प्राथमिक शाळेतील प्रवेशोत्सव मोठया आनंदात साजरा झाला. यावेळी विदयार्थ्याची प्रभात फेरी शालेय परीसरात वाजत गाजत सकाळी १० वाजता काढण्यात आली. प्रवेश द्वरात रात विदयार्थ्याचे औक्षण करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या पूजनाने मोफत पाठ्यपुस्तकेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम संस्थेच्या सेक्टरी डॉ. वर्षा काणे व सहसेक्रेटरी डॉ. मृणाल गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी नवगतांचे स्वागत संस्थापकानी गुलाब पुष्प देवनि केले. शाळेची सजावट पान पुलांच्या तोरणाने व रांगोळीने करण्यात आली. विदयार्थांनी आनंदाने कृती गीत सादर केले.

डॉ.सौ. वर्षा काणे मॅडम यांनी पुस्तक वाटप कार्यक्रमाच्या वेळी मोलाचा संदेश दिला. आपण पुस्तकांची काळजी घेतली तर भविष्यात तिच पुस्तके आपली काळजी घेतात.

मुलांनी शाळेचा पहिला दिवस या विषयावर खुप छान मनोगते सादर केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. शितल आ. लोखंडे व सहशिक्षिका सौ. सुरेखा परचंडे तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम केले.