पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना निलंबित करा.

अन्यथा उपोषण करण्याचा दिला इशारा.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना निलंबित करा.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना निलंबित करा

 मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

अन्यथा उपोषण करण्याचा दिला इशारा.

पंढरपूर दिनांक 28 जुलै..परवाच्या आषाढी यात्रा काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत यशोधरा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था नाशिक यांना बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद पुरवठा करण्याचे काम दिले होते. आषाढी पूर्व तयारी म्हणून 1 जुलै 2022 पासून प्रसाद पुरवठा मंदिर समितीकडे होत आहे. 2 बुंदी लाडू चे वजन 140 ग्रॅम वजनाचे कागद पॅकिंग करून देणे असे करारामध्ये असताना प्रत्यक्ष मात्र 120 ग्रॅम बुंदी लाडू पुरवठा करण्यात येत होते. तसेच राजगिराला प्रसादाचे 2 लाडू चे वजन करारानुसार 50 ग्रॅम आवश्यक होते परंतु ते वजन 30 ते 33 ग्रॅम भरत होते. याबाबत सोलापुर येथील वजन मापन विभागास लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांनी सदर संस्थेच्या पंढरपूर येथील उत्पादक केंद्रावर छापा मारून तपासणी केली असता अधिकाऱ्यांना त्यामध्ये अनियमितता व तथ्य आढळून आले असून तसा अहवाल प्राप्त झाला असल्याने त्यांनी संस्थेवर संदर्भ क्र.2 नुसार खटला दाखल केला आहे.

आषाढी वारीच्या कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सदर लाडू उत्पादन केंद्राची तपासणी करण्यात असून त्यांच्या अहवालामध्ये सुद्धा स्वच्छता नसणे नियमाचे पालन न करणे फूड लायसन नसणे उत्पादन परवाना नसणे या गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत . त्यांचा अहवाल क्र. 3 अन्वये मंदिर समितीस प्राप्त आहे. तरीही त्या पुरवठा दाराबरोबर आर्थिक वाटाघाटी करून या गंभीर प्रकाराकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये भाविकांची मोठी फसवणूक व लुटमार होताना आहे.

आषाढी वारीमध्ये 8 लाख बुंदी लाडू प्रसाद व 2 लाख राजगिरा लाडू प्रसाद भाविकांना अल्प दरात उपलब्ध करणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष ओवसेकर व कार्यकारी अधिकारी श्री गुरव यांनी घोषित केले होते. परंतु सदर संस्थेने मागणीच्या 40% सुद्धा प्रसाद पुरवठा केलेला नाही यामुळे परिणामी मंदिर समितीचे सुमारे 70 लाखाचे नुकसान झाले आहे. यापूर्वी दर आषाढी यात्रा कालावधीत 10 लाख लाडू प्रसाद विक्री केली जात होती. यावरून मंदिर समिती सदर ठेकेदाराला पाठीशी घालून भाविकांची आर्थिक लूटमार व फसवणूक करत असल्याचे चित्र अहवालानुसार व करारातील अटीनुसार सिद्ध झाल्याचे दिसून येत आहे. येत्या 3 दिवसाच्या आत करारातील अटी व शर्तीनुसार सदरचा ठेका रद्द नाही झाल्यास मंदिर समिती पंढरपूर यांच्या विरोधामध्ये आम्ही वारकऱ्यांना सोबत घेऊन गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी येथील प्रांत कार्यालय समोर पंढरपूर या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कार्यकारी अधिकारी हे हस्ते पर हस्ते खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची व शासकीय कामात व्यत्यय आणले म्हणून सदर अर्जदार यांना धमकी देत असल्याचे लेखी तक्रारीमध्ये अर्जदार यांनी म्हटले आहे. तेव्हा या बाबतीत संबंधित व दोषी असणाऱ्यांना निलंबित करावे असेही शेवटी लेखी तक्रारअर्जा यामध्ये म्हटले आहे.