माघी यात्रा जया एकादशी 5 लाख भाविकांच्या उपस्थितीत एकादशी सोहळा संपन्न.

गोपाळपूर पत्रा शेड दर्शन रांग फार लांब लचक

माघी यात्रा जया एकादशी 5 लाख भाविकांच्या उपस्थितीत एकादशी सोहळा संपन्न.

माघी यात्रा जया एकादशी 5 लाख भाविकांच्या उपस्थितीत एकादशी सोहळा संपन्न.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे माघी यात्रा जया एकादशी निमित्त सुमारे पाच लाख भाविकांच्या साक्षीने आज मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला आहे.शहरातील गोपाळपूर पत्रा शेड दर्शन रांग फार लांब लचक लागलेली होती दर्शन बारीला लागल्यानंतर श्री विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी सलग बारा ते दहा तास लागत होते. आज एकादशी असल्याने मंदिर परिसरातील नामदेव पायरी चोखोबा मंदिर महाद्वार येथे वारकरी भाविकांची मुखदर्शनासाठी गर्दी दिसून येत होती. त्याचबरोबर ज्ञानेश्वर मंडप, चौफळा, शिवाजी चौक नाथ चौक या ठिकाणी वारकरी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विशेष करून माघी यात्रेला कर्नाटक कोल्हापूर बेळगाव यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात. मंदिर परिसर व पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी प्रसाद दुकाने टाळ मृदूम गळ्यातील तुळशीच्या माळा, प्रसाद म्हणून कांडे बताशा चिरमुरे साखर लाह्या यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे पंढरी नगरीत विविध दुकाने सजली होती. बऱ्याच ठिकाणी वारकरी भाविकांची विविध वस्तू खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर 65 एकर या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दिंड्यांसाठी भव्य मंडप पाले टाकून राहूट्या उभ्या केले आहेत. आज एकादशीनिमित्त प्रदक्षिणा मार्गावर प्रत्येक संतांच्या पालख्यां दिंड्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी भजन करीत टाळ मृदुंगाच्या आवाजाने तसेच हरिनामाच्या जयघोषाने आखी पंढरी दुमदुमून निघाली आहे.