चंद्रभागा नदी पात्रात पोहत असताना दम लागल्याने बुडणाऱ्या तरुण भाविकाला वजीर पथकाकडून जीवनदान

नदीपात्रात उतरणार्‍या प्रत्येक भाविकांनी स्वतःहून काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रभागा नदी पात्रात पोहत असताना दम लागल्याने बुडणाऱ्या तरुण भाविकाला वजीर पथकाकडून जीवनदान

चंद्रभागा नदी पात्रात पोहत असताना दम लागल्याने बुडणाऱ्या तरुण भाविकाला वजीर पथकाकडून जीवनदा

नदीपात्रात उतरणार्‍या प्रत्येक भाविकांनी स्वतःहून काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सोलापूर, दि.7(जिमाका):- आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून आलेला सतरा ते अठरा वर्षाचा तरुण वारकरी भाविक पुंडलिक मंदिरासमोर चंद्रभागा नदीत स्नानासाठी आज सायंकाळी पाचच्या सुमारास उतरला व पोहत नदीपात्रात दूरपर्यंत गेला, परंतु त्याला दम लागल्यामुळे तो नदीच्या पाण्यात बुडत होता. त्यावेळी नदीपात्रात गस्त घालणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वजीर पथकातील बचाव दलाने त्या तरुण भाविकाचा जीव वाचवून त्याला जीवनदान दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी दिली.

          ही घटना आज सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडलेली असून यावेळी बचाव दलाने बालाजी या तरुणास जीवनदान दिले. परंतु तो अत्यंत घाबरलेला होता त्यामुळे त्याला स्वतःचा व्यवस्थित परिचय करून देता आलेला नाही. तसेच त्याच्या सोबत एक बुजुर्ग व्यक्ती होती त्या व्यक्तीलाही व्यवस्थित माहिती देता आलेली नाही. परंतु बचाव दलाने त्या भाविकास जीवनदान दिले आहे व त्याची तब्येत व्यवस्थित असून तो भाविक त्याच्या नातेवाईक सोबत सुखरूप गेलेला आहे, अशी माहिती

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.

         आषाढी वारीसाठी प्रतीवर्षी 12-14 लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपूर येथे येत असतात. कोविड मुळे मागील दोन वर्षे आषाढी वारी यात्रा झालेली नाही, त्यामुळे यावर्षी पंढरपूर येथे मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के भाविक अधिक येण्याची शक्यता आहे. तरी येथे येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांनी स्नानासाठी चंद्रभागा नदीपत्रात

काळजी घेऊन उतरावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत विविध बचाव पथके नदीतीरावर व नदीपात्रात सतर्क ठेवण्यात आलेले आहेत. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक भाविकांनी व त्यांच्या सोबत असलेल्या इतर भाविकांनी स्वतःहून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.