झिका व्हायरस: आरोग्य यंत्रणा सज्ज

रुग्णास झिका आजारावर विशिष्ठ औषध उपलब्ध नाही.

झिका व्हायरस: आरोग्य यंत्रणा सज्ज

झिका व्हायरस: आरोग्य यंत्रणा सज्ज

पंढरपूर, दि. 18 :- झिका व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, शहरात जिल्हा हिवताप कार्यालयाकडून दि. 6 नोव्हेंबर2023 पासून किटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. तसेच जिल्हा हिवताप कार्यालय, नगरपरिषदेचे नागरी हिवताप कार्यालय व पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाव्दारे झिका व्हायरस तसेच इतर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी दिली.झिका व्हायरच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या संयुक्त पथव्दारे शहरात किटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण, डास पकडणे, धुर फवारणी करणे, अळीनाशक औषधांचा वापर करणे, रक्तजल नमुने पाठविणे, गरोदर माता शोधने, नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत ९४ घरांची तपासणी करण्यात आली असून, २५७ कंटेनर तपासले आहेत. तसेच चार रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पंढरपूर येथील संबधित संशयित रुग्ण मागील एक महीन्यापासून मुंबई येथे वास्तव्यास होते. पुणे येथे उपचार घेवुन बरे आहेत. कार्तिकवारीच्या अनुषंगाने कोणीही घाबरु नये असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी केले आहे.  

झिका आजाराची लक्षणे:-

•ब-याच रुग्णामध्ये झिका आजाराची लक्षणे ही डेंगु आजारा प्रमाणेच असतात, यामध्ये ताप डोळे येणे, सांधे व स्नायु दिखु, अंगावर लालसर चट्टे उमाटणे यांचा समावेश आहे. ही लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात व एक आठवडे पर्यंत राहतात. 

• झिका आजारासाठी दवाखाने मध्ये दाखल होण्याची आवश्यता भासत नाही, या आजारामध्ये मृत्युचे प्रमाण हे नगण्य आहे. तसेच या आजारामध्ये गरोदर माता यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.झिका विषानुचा प्रर्दुभाव दुषित एडिस डासाच्या चावण्यामुळे होतो, या आजाराचे निदान राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे होते.

 • रुग्णास झिका आजारावर विशिष्ठ औषध उपलब्ध नाही.लक्षणानुसार उपचार केला जातो.पुरेशी विश्रांती व द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. तापाकरीता पॅरासिटेमल औषध वापरावे.

नागरिकांना आवाहन:-

• या आजारामध्ये नागरिकांना दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागत नाही, तसेच मृत्युचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची आवश्यक्ता नाही.

• ताप आल्यास सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत.

•डास उत्पतीची ठिकाणे नष्ट करणे, पाणीसाठे आठवडयातुन एकदा रिकामे करुन स्वच्छ करणे, मच्छरदानी व डास प्रतिबंद मलम यांचा वापर करावा.

• वापरात नसलेल्या बाटल्या, जुनी टायर तसेच फुटकी भांडी याची विल्येवाट लावावी. मोठया पाणीसाठ्यात गप्पीमासे सोडावेत.

वरील प्रमाणे प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना केल्यास आपले घर, गल्ली, गाव झिका, डेंगु या आजारावरती नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

पंढरपूरातील झिका व्हायरस बाधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा

पंढरपुर येथील एका 71 वर्षीय नागरिकास संशयित झिका व्हायरस रोगाची लागण झाल्याने संबधित रुग्णावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनीदिनांक 12 ते 17 ऑक्टो २०२३ या दरम्यान संशयित रुग्ण हे त्यांच्या मुलाकडे प्लॅट नं ८ मसालावाला बिल्डींग माहीम वेस्ट मुंबई येथे वास्तव्यास होते, नंतर दि. 19 ऑक्टो.2023 रोजी संशयित रुग्ण हे पंढरपुर येथील घरी आले यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता दिनांक 24 ऑक्टो. 2023 रोजी त्यांना ताप, अंगदुखी, सर्दी झाली म्हणुन त्यांनी स्वतः घरीच उपचार घेतले. नंतर दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेतले. दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी उलटी व जुलाब होवुन चक्कर आली व रक्तदाब कमी झाल्यामुळे उपचार सुरु केले. परंतु त्यांना दम लागत होता व तो कमी होत नसलेमुळे पुणे येथील जहांगिर हॉस्पिटल येथे विशेष रुग्णवाहीकेने हलवण्यात आले. पुणे येथील रुग्णालयात वेगवेगळया तपासण्या सुरु असुन, त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. मध्येच प्रकृती खालावली म्हणुन संशयित रुग्णास व्हेंटिलेटर पाच दिवस लावण्यात आले. दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पासुन व्हेंटिलेटर काढला असुन प्रकृती सुधारत आहे. ही सर्व माहीती संशयित रुग्ण यांच्या मुलाने दिली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.