होय जनक भोसले हा सभासद; तो माझा कार्यकर्ता:- अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणूकीचे बिगुल वाजले असून दि.३जून पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.

होय जनक भोसले हा सभासद; तो माझा कार्यकर्ता:- अभिजीत पाटील

होय जनक भोसले हा सभासद; तो माझा कार्यकर्ता:- अभिजीत पाटी

प्रत्येक अन्यायग्रस्त सभासदांचा व कामगारांचा सन्मान परत मिळवून देणार

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणूकीचे बिगुल वाजले असून दि.३जून पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगिरथ भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती. गेली दोन वर्षांपासून विठ्ठल कारखाना बंद अवस्थेत आहे. शेतकऱ्याची ऊस बील, कामगार पगार व वाहतूक ठेकेदाराची देणी दिली नसल्याने शेतकरी सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यावेळी दाते मंगल कार्यालय येथे विचार विनिमय बैठक सुरू असताना रोपळे येथील ऊस उत्पादक सभासद जनक भोसले यांनी शेतकऱ्यांची बीले कधी देणार?  कामगारांचे पगार कधी देणार? अशी विचारणा केली.यावेळी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके,कल्याणराव काळे व संचालक मंडळाच्या समोरच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ केली होती.यावर अभिजीत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.प्रत्येक सभासद शेतकरी हा कारखान्याचा मालक असतो आणि विठ्ठलच्या प्रत्येक सभासद शेतकरी व कामगारांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
     आपल्या हक्काच्या बिलासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला विनाकारण शिवीगाळ व मारहाण झाल्याने त्याचाच निषेध करत रोपळे येथील गावकऱ्यांनी गावबंदीची हाक दिली आहे.त्यामुळे भालके व काळे गटाची मोठी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे

तुम्ही विठ्ठल कारखान्याची विचार विनिमय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सभासद असलेले जनक भोसले यांनी त्याच्या बिलासंदर्भात व त्यांच्या नावावर काढलेल्या बोगस कर्जावर विचारा केली हा त्यांना अधिकार नाही का? तो कुठल्या घटनेत लिहिलेला आहे? सभेमध्ये जनक भोसलेंनी सभासद या नात्याने आपले हक्काचे बिल मागितले तो अधिकार त्याला नाही का?
तो कार्यकर्ता कोणाचा यावर न बोलता त्यांची अडचण सोडवायला हवी.जर तुम्हाला एखादी भूमिका मान्य नाही तर तुम्ही सभासदाला अशी एकेरी वागणूक देत असाल तर विठ्ठल परिवाराचा सभासद कदापिही तुम्हाला माफ करणार नाही.