मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावरून सामना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावरून सामना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावरून सामन

आखे शिंदे गटाला नाव मिळाले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

शिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना हे नाव

पंढरपूर दिनांक 10 ऑक्टोबर पक्षप्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे व शिवसेनेचे श्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष नंतर सत्तांतर झाले . एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 40 आमदाराना सोबत घेऊन भाजप पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकता साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमध्ये गेली शंभर दिवसात टोकाचा वाद व संघर्ष वाढला.

त्यानंतर गेल्या काही दिवसापासून शिवसेना कोणाची शिंदे का उद्धव ठाकरे यांची याबाबत दोघांचाही वाद विकोपाला जाऊन हाय कोर्टा पर्यंत पोहचला. शिवसेना नावाची आणि चिन्हाची हायकोर्टाने जबाबदारी निवडणूक आयोग यांच्यावर टाकली त्याप्रमाणे आयोगाने शिंदे व ठाकरे गटांना कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले आणि पर्यायी पक्षांची तीन नावे व चिन्हांची तीन चित्रांची मागणी आयोगाने केली. त्यावेळी आईकडे कागदपत्र सादर करताना ठाकरे गटांच्या कागदपत्राचा संशय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना आल्याने शिंदे गटाने स्टॅम्प पेपर अफ्युडेटची चौकशी लावली त्यावेळी बरेच बोगस अफ्यूडेट केल्याचे समोर आले. परंतु आयोगाने केवळ तीन दिवसाचीच मुदत दिली होती. त्यामुळे कार्यालयीन वेळेत निवडणुका आयोगाकडे शिंदे व ठाकरे गटांनी पर्यायी पक्षांची नावे व चिन्ह यांची मागणी केली त्यावर आज सोमवार 10 ऑक्टोबर2022 रोजी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले तर उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर शिक्का मोर्तब केलेआहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना फक्त बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे परंतु त्यांचे चिन्हावर मात्र आणखी शिक्का मोर्तब झाले नाही . तसेच आयोगाने त्रुशील व गदा हे चिन्ह रद्द केल्याने उरले चिन्ह फक्त उगवता सूर्य आणि त्रिशूल या दोन्हीपैकी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह पसंत नसावे त्यामुळे हा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला असल्याचे समजते. परंतु आजच्या या शिवसेना पक्षाचे नाव मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना म्हणून नाव दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.