चंद्रभागा नदीमध्ये बुडणाऱ्या 2 भाविकांचा पंढरपूर नगर परिषदेच्या पथकाने वाचवला जीव

दुर्घटना घडू नये म्हणून नगरपरिषद ची टीम नदीपात्रामध्ये

चंद्रभागा नदीमध्ये बुडणाऱ्या 2 भाविकांचा पंढरपूर नगर परिषदेच्या पथकाने वाचवला जीव

चंद्रभागा नदीमध्ये बुडणाऱ्या 2 भाविकांचा पंढरपूर नगर परिषदेच्या पथकाने वाचवला जीव

पंढरपूर मध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत या आषाढी यात्रेनिमित्त आलेले भावीक अतिशय श्रद्धेने चंद्रभागेमध्ये स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेत असतात या यात्रेच्या निमित्ताने कृष्णा भंडारे व आणखी एक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडत असल्याचे नगर परिषदेचे नदी पात्रामध्ये गस्त घालत असलेल्या पथकाच्या निदर्शनास येताच सदर बोटीमध्ये असलेले श्री गणेश तारे व अक्षय भोसले यांनी नदीपात्रात उडी घेत लाईफ रिंग त्याला देत दोरीच्या साहाय्याने त्या भाविकांचा जीव वाचवला असल्याची माहिती अग्निशामन अधिकारी संभाजी कार्ले यांनी दिली 

सध्या नदीपात्रामध्ये नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये म्हणून स्पीकर द्वारे सूचना दिल्या जात आहेत तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगरपरिषद ची टीम नदीपात्रामध्ये पहाटेपासून संध्याकाळी होईपर्यंत गस्त घालत असते तरी भाविक खोल पाण्यात जात आहेत तरी सर्व भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये व आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे व ज्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भाविकांचा जीव वाचवला त्या कर्मचाऱ्यांचेही मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर त्यांनी अभिनंदन केले आहे