महसूल सप्ताह अंतर्गत "सैनिक हो तुमच्यासाठी" हा उपक्रम.

जिल्हाधिकारी यांच्याकडून कुटुंबीयांची भेट व कुटुंबीयांचा सन्मान

महसूल सप्ताह अंतर्गत "सैनिक हो तुमच्यासाठी" हा उपक्रम.

महसूल सप्ताह अंतर्गत "सैनिक हो तुमच्यासाठी" हा उपक्रम.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून शहीद किसन माने यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील शहीद किसन माने यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून कुटुंबीयांची भेट व कुटुंबीयांचा सन्मान

पंढरपूर दिनांक 5(उ मा का):- जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत "सैनिक हो तुमच्यासाठी" हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान तसेच अडचणी सोडविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील शहीद किसन माने यांच्या निवासस्थानी गेले व तिथे त्यांनी शहीद माने यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, मंडल अधिकारी शामला कुंभार, तलाठी सारिका कोंढारे यांची उपस्थिती होती.

    शहीद माने यांच्या निवासस्थानी सुशांत माने, सचिन माने यांचे व त्यांच्या पत्नी तसेच त्यांची छोटी मुले या सर्वांचा सन्मान जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केला. प्रांताधिकारी समींदर यांनी ही शहीद कुटुंबाचा तालुक्याच्या वतीने सत्कार केला. स्मारक स्वतःच्या शेतामध्ये आणि ते झाडाच्या खाली सावलीमध्ये असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना हे स्थळ आवडले. शहीद किसन माने हे कारगिल युध्दानंतर एका मिशनवर असताना झालेल्या अपघातात ते शहीद झाले. त्याची सर्व माहिती सुशांत माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी माने कुटुंबीयांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. स्वतः जिल्हाधिकारी आपल्या निवासस्थानी आल्याने माने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते.

      महसूल सप्ताह अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहे.